परवडणाऱ्या घरांसाठी सर्वपसंत पर्याय म्हणजे पुणे

November 29, 2018

Affordable Homes

परवडणाऱ्या घरांसाठी सर्वपसंत पर्याय म्हणजे पुणे

परवडणाऱ्या घरांसाठी सर्वपसंत पर्याय म्हणजे पुणे |Why Pune Is The Best City To Buy Affordable Property

नोकरीसाठी आपलं गाव आणि शहर सोडून मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाच्या प्रत्येक पिढीने सातत्याने केलेलं एक विधान म्हणजे- “मुंबईत घर घेणं परवडत नाही.” घरांच्या किमती आणि पगार ह्यात कायमच तफावत असते, परंतु मुंबईसारख्या मोठ्या शहरांत ती अधिक पहायला मिळते. परंतु गेल्या काही वर्षांत शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात मुंबईबरोबरच लक्षणिकरित्या प्रगती करणारं महाराष्ट्रातलं दुसरं महत्वाचं शहर म्हणून पुणे शहर नावारूपाला आलंय. प्राचीन काळापासून विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर आता नोकरीसाठीही हॉट स्पॉट म्हणून ओळखलं जातं. शिक्षण घ्यायला पुण्यात आलेली अनेक जणं इथेच नोकरी मिळाल्याने आपलं बस्तान बसवतात. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या पुण्यातल्या गुंतवणुकींमुळे पेठांपुरतं मर्यादित असलेल्या पुण्याच्या कक्षा प्रमाणाबाहेर विस्तारल्या आहेत. शहराची वाढ होण्याचं हेच मुख्य कारण आहे. ह्या कंपन्या मुख्यत्वे हिंजेवाडी, बाणेर, वाकड, इ. भागात असल्याने नोकरीच्या ठिकाणच्या आसपास राहण्यालाच लोकं प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळे हिंजेवाडी, तळेगाव, बाणेर, वाकड, बावधन ह्या भागात घरांना प्रचंड मागणी आहे. ह्याची प्रमुख कारणं म्हणजे-

  • मोठ्या प्रमाणावर होणारं स्थलांतर-
    विद्येचं माहेरघर असणारं पुणे नोकरीचही माहेरघर होण्याच्या मार्गावर आहे. शिक्षणाबरोबरच नोकरीच्याही अगणित संधी आणि तितकेच असंख्य पर्याय पुण्यात उपलब्ध आहेत. शिक्षण एका शहरात आणि नोकरी आणखी दुसऱ्या शहरात अशी परिस्थिती पुण्यात ओढावत नाही. शिकायला आलेली व्यक्ती आता इथेच स्थायिक होताना दिसते. अशा मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या संधींमुळे इतर शहरातून शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे.
  • बदललेला दृष्टीकोन-
    पुण्याकडे आता निवृत्त लोकांचं शहर म्हणून पाहिलं जात नाही. आर्थिक, तांत्रिक, शैक्षणिक आणि इतरही अनेक बाबतीत पुण्याचं झालेलं रूपांतर लपून राहिलेलं नाही. त्यामुळे पुणे आता फक्त निवृत्तीनंतर रहायचं शहर राहिलेलं नसून नोकरी आणि करिरच्या दृष्टीनेही उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहे.
  • घरांच्या परवडणाऱ्या किमती-
    शेजार म्हणून लाभलेल्या मुंबई ह्या आर्थिक राजधानीपेक्षा पुण्यात घरांच्या किमती बऱ्याच कमी आहेत. नोकरी मुंबईत करायची आणि शहराबाहेर कुठेतरी रहायचं हे समीकरणं पुण्याने मोडीत काढलेलं दिसून येतं. जिथे रहातो तिथेच नोकरी करता येणं पुण्यात शक्य आहेत, शिवाय तिथे खिश्याला परवडेल अश्या दरात स्वतःचं नवीन घरं घेणंही शक्य आहे. शिवाय, मुंबईत रहात असलेली लोकंही दुसरं घर घेण्यासाठी पुण्याकडेच धावतात, कारण मुंबईतल्या आणि पुण्यातल्या जागांच्या किमतींची तुलना केली, तर गुंतवणूक म्हणून पुण्यातच घर घेणं परवडणारं आहे.

Pune Property

  • प्रगतशील उपनगरं-
    पुण्यात परवडणाऱ्या घरांची संख्या वाढण्यामागचं प्रमुख आणि महत्वाचं कारण म्हणजे झपाट्याने विकसित होणारी उपनगरं. गेल्या काही वर्षांत प्रचंड वेगाने विकसित झालेल्या बाणेर, बालेवाडी, वाकड, तळेगाव, रहाटणी ह्या भागांनी शहराच्या कक्षा रूंदावल्या आहेत. गावाबाहेर दूर कुठेतरी असलेली गावं म्हणून आता ह्या भांगाकडे पाहिलं जात नाही. शिवाय, गाडी, बस, किंवा लोकलच्या सोयींमुळे तिथे कमी वेळात आणि सहज पोहोचणंही शक्य आहे.
  • आरामदायी जीवनशैली-
    सततच्या धवपळीचा लवलेशही नसलेलं शहर म्हणजे पुणे. नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य ह्या दोन्हींमध्ये उत्तम समतोल साधता येणं पुण्यात सहज शक्य आहे. इथलं वातावरण, सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळं, मनोरंजनाचे उत्तम पर्याय, खाद्यसंस्कृती, नैसर्गिक संपदा ह्यामुळे नुकत्याच जाहिर झालेल्या Ease of Living Index ह्या यादीत भारतात राहण्यासाठी उत्तम शहर म्हणून पुण्याने बाजी मारली आहे.

Related Blog