Tips To Improve Credit Score CIBIL Score Marathi Information

 • Posted by: Sahir
 • 17th December, 2018

Credit Score

सिबील स्कोअर चांगला राखण्याच्या टीप्स

सिबील (CIBIL) किंवा क्रेडिट स्कोअर (Credit Score) म्हणजे तुमच्या आर्थिक व्यवहारांचा लेखाजोखा असतो. आपण केलेल्या प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांचा सिबील ह्या संस्थेकडून पाठपुरावा होतो, आपल्या आर्थिक सवयी तपासल्या जातात, आणि त्यानुसार आपल्याला एक मानांक मिळतो, त्यालाच क्रेडिट किंवा सिबील स्कोअर म्हणतात. हा अंक किंवा हे रेटींग जितकं चांगलं तितकी कर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते. हा स्कोअर चांगला राखण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी करायच्या काही गोष्टी-

 • वारंवार कर्जासाठी अर्ज करू नका-
  कोणत्याही कर्जाचा अर्ज नामंजूर झाल्यावर पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या बँकामध्ये अर्ज करत राहणे चुकीचे आहे. ह्यातून आपल्याला पैश्यांची आणि कर्जाची असणारी तातडीची गरज लक्षात येतेच, परंतु ती कुठेही स्विकारली जात नसल्याची बाबही ठळकपणे स्पष्ट होत रहाते. आपल्याला कर्ज मंजूर होत नसण्याचं प्रमुख कारण नेहमीच आपली परतफेडीची क्षमता नसणे हे असते. ती क्षमता वाढवण्याऐवजी सतत वेगवेगळ्या आर्थिक संस्थांकडे कर्जासाठी अर्ज करत राहणे आपला मानांक किंवा आर्थिक पत बिघडवू शकते.
 • कर्जांची वेळेत परतफेड करा-
  आधी घेतलेल्या कर्जांची परतफेड आपण कशी करत आहोत, हा ही घटक क्रेडिट स्कोअर सुधरवू किंवा बिघडवू शकतो. बँकानी नेमून दिलेल्या वेळेत आणि पद्धतीने कर्जाची परतफेड न झाल्यास, हप्ते चुकल्यास आपला क्रेडिट स्कोअर खाली घसरतो. त्यामुळे सर्व कर्जांचे हप्ते वेळेत भरण्यावर भर द्या.
 • क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरा-
  क्रेडिट कार्डचे बिल आले की त्यात कमीत कमी रक्कम भरण्याचा एक रकाना असतो. पेनल्टी म्हणजेच दंड लागू नये ह्यासाठी आलेल्या बिलापैकी कमीत कमी दिलेली रक्कम भरणे क्रमप्राप्त असते. पण ह्याचा अर्थ उरलेली रक्कम कधीही भरली तरी चालते असे नाही. क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल शक्य तोवर एकरकमी आणि वेळेत भरण्यास प्राधान्य द्या. क्रेडिट कार्ड मिळणे ही गोषअट तुमची आर्थिक स्थिती चांगली असण्याचं प्रतिक आहे. त्यामुळे त्याची बिलं वेळेत न भरण्याची सवय आपली आर्थिक स्थिती चांगली असली तरी, आर्थिक सवयी वाईट असल्याचं सुचवते. म्हणून क्रेडिट कार्डचे बिल अंतिम तारखेच्या आत संपूर्ण भरण्याची सवय ठेवा.
 • अनेक कर्ज घेऊ नका-
  चांगला स्कोअर असताना, मंजूर होतंय म्हणून एकाच वेळी अनेक कर्ज घेणं टाळा. कर्ज मंजूर होत असले तरी, त्यांची परतफेड करताना तुमच्या आर्थिक नियोजनावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून एकाचवेळी अनेक कर्ज माथी घेण्याचा मोह आवरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *