Real Estate Dictionary

January 12, 2019

रिअल इस्टेट डिक्शनरी

बांधकाम व्यवसायात आणि एकुणच रिअल इस्टेट क्षेत्रातल्या बऱ्याच बातम्या सध्या ऐकायला येतात. त्यात होणाऱ्या सुधारणा आणि नवनवीन कायदेही कुठे ना कुठे पहायला अथवा वाचायला मिळतात. त्यात अनेक शब्द आणि शब्दसंक्षेप म्हणजेच शॉर्टफॉर्म लिहीलेले असतात. काही परिचीत शब्द सोडले तर इतर अनेक शब्दांची नेमकी व्याख्या आपल्याला माहिती नसते. त्यामुळे त्या बातम्यांमधल्या, कायद्यांमधल्या किंवा बिल्डर फ्लॅटबद्दल सांगतो त्या फ्लोअर प्लॅनमधल्या कित्येक गोष्टी आपल्याला नीट समजत नाहीत. अश्याच काही संज्ञांची डिक्शनरी तुमच्यासाठी-

  • कार्पेट एरिया (Carpet area)- कार्पेट एरिया म्हणजे बिल्ट अप एरियातून भिंती आणि छताच्या बांधकामात म्हणजेच विटांमध्ये वाया गेलेली जागा वगळता उरलेला भाग. ह्या शब्दाची व्युतप्त्ती अतिशय सोपी आहे. कार्पेट म्हणजे साध्या भाषेत सतरंजी आंथरता येईल असा भाग. घरात ज्या ज्या भागात, अर्थात जमिनीवर सतरंजी आंथरता येते म्हणजेच जो भाग रोजच्या अनेक गोष्टींसाठी वापरता येतो, तो म्हणजे कार्पेट एरिया. कार्पेट एरिया नेहमी बिल्ट अप एरियापेक्षा कमी असतो.
  • बिल्ट अप एरिया (Built up area)- बिल्ट अप एरिया म्हणजे घर/फ्लॅटचा आपण वापरू शकत असलेला व नसलेला सर्व भाग. ह्या एरियामध्ये भिंतींची रूंदी(Thickness of the walls) सुद्धा मोजली जाते. भिंती म्हणजेच विटांमध्ये जे जागा जाते, ती तांत्रिकदृष्ट्या फ्लॅटचा भाग अशली तरी आपल्या वापरासाठी उपयुक्त नसते. तिथे आपला वावर असू शकत नाही. भिंतींवर काही सामान लटकवलं जाऊ शकतं, परंतु ह्या सगळ्यात विटांच्या लांबी-रूंदीची जागा वापरात येत नाही. भिंत महत्वाची असली तरी घरात त्या जागेची उपयुक्तता नसते. ह्याचाच अर्थ, घरातल्या भिंती आणि छतासह मोजल्यावर घराचा एरिया जितका भरतो, त्याला बिल्ट अप एरिया म्हणतात.
  • सुपर बिल्ट अप एरिया (Super built-up Area)- सुपर बिल्ट अप एरिया म्हणजे बिल्ट अप एरियाची पुढची पायरी. ह्या एरियामध्ये घराचा/फ्लॅटचा सोडून बिल्डिंगमधला इतर वापरण्याजोगा भागही धरला जातो,. उदा.- पॅसेज, जिने, लिफ्ट, लॉबी, इ. ह्यालाच सेलेबल एरिया (Saleable Area) असेही म्हणतात.
  • बुकींग अमाऊंट (Booking amount)- ह्याला टोकन असेही म्हणतात. एखादी जागा/फ्लॅट पसंत पडल्यावर तो खरेदी करणे जागच्याजागी एकरकमी शक्य नसते. शिवाय त्यावेळी तो संपूर्णपणे बांधून तयार असेलच असेही नाही. उरलेल्या रकमेची जमवाजमव करेपर्यंत किंवा बांधकाम पूर्ण होईपर्यंत ती जागा/फ्लॅट आपण खरेदी करणार आहोत आणि तो विकला गेलेला आहे हे निश्चित करण्यासाठी एक ठराविक रक्कम आपल्याला बिल्डरला/विक्रेत्याला द्यावी लागते. म्हणजेच ती जागा/फ्लॅट आपण आपल्या नावावर राखून ठेवायला/बुक करून ठेवायला सांगतो. ह्या रकमेलाच बुकींग अमाऊंट किंवा टोकन म्हणतात.
  • बी.एच.के. (BHK)-
    बेडरूम, हॉल, किचन. भारतीय घरांचे काही ठराविक प्रकार असतात. त्यात फ्लॅटचा प्रमाणित साचा म्हणजे एक स्वयंपाकघर, एक बैठकीची खोली ज्याला लिव्हींग रूम असेही म्हणतात, आणि उरलेल्या १ किंवा २ खोल्या बेडरूम असा असतो. ह्या साच्यामध्ये स्वयंपाकघर किंवा बैठकीची खोली सामाईक (कॉमन) असल्याने त्यांची संख्या जास्तीत जास्त १ एवढीच असू शकते. परंतु, बेडरूमची संख्या नक्की वाढू शकते. म्हणून बैठक (हॉल) आणि स्वयंपाकघर (किचन) हे एकच राहून बेडरूमच्या बदलणाऱ्या संख्येप्रमाणे 2BHK, 3BHK असे शब्द लिहीले जातात.
  • ऍमेनिटीज (Amenities)-
    बिल्डरने बिल्डिंगमध्ये/सोसायटीमध्ये आणि संपूर्ण आवारात प्राथमिक गरजांशिवाय दिलेल्या सोयीसुविधांना ऍमेनिटीज म्हणतात. उदा.- क्लबहाऊस, स्विमींग पूल, गार्डन, जिम, इ.अश्या भरपूर ऍमेनिटीजनी स्वयंपूर्ण असलेल्या नम्रता गृपच्या रहाटणीतल्या Life 360, Rahatni ह्या प्रोजेक्टला नक्की भेट द्या.
  • फ्लोअर प्लॅन (Floor plan)-
    फ्लोअर प्लॅन म्हणजे बांधकामाचा आराखडा, विशेषतः एखाद्या फ्लॅटचा. एखादा फ्लॅट कसा बांधायचा योजला आहे, त्यात किती खोल्या असणार आहेत, त्या घरात नेमक्या कुठे असणार आहेत, त्यांचा यायचा जायचा रस्ता कोणता आणि कुठून असणार आहे, घरातल्या दिशा ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींचा आराखडा म्हणजे फ्लोअर प्लॅन. संपूर्ण बांधकाम झाल्यावर तो फ्लॅट कसा दिसेल ह्याचं मोजमाप घेऊन त्याचं चित्र दाखवणं म्हणजे फ्लोअर प्लॅन. तो पाहिल्यावर आपल्याला घर नक्की कसं दिसेल, किती मोठं असेल, घराची रचना कशी असेल ह्याचा अंदाज येतो.
  • रेरा क्रमांक (RERA Number)-
    रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍक्ट (Real Estate Regulatory Act). सरकारच्या ह्या नवीन कायद्यानुसार कोणताही बांधकाम प्रकल्प ह्या कायद्यांतर्गत नोंदणीकृत केल्याशिवाय तो जाहिर करता येणार नाही आणि/किंवा त्याची कोणत्याही प्रकारे कोणत्याही पद्धतीने कोणत्याही माध्यमाद्वारे जाहिरात करता येणार नाही. शिवाय, त्या प्रकल्पात/प्रकल्पातील घर नोंदणीआधी विकणे बेकायदेशीर असेल. ह्या सर्व बाबींबरोबरच, त्या प्रकल्पाविषयीचे सर्व तपशील ग्राहकाला देण्यासाठी नकार देता येणार नाही. बांधकाम व्यवसायात ग्राहकांची होणारी फसवणूक टाळून पारदर्शकता यावी यासाठी हा कायदा अंमलात आणण्यात आला आहे. त्यामुळे बांधकाम प्रकल्पाच्या कोणत्याही जाहिरतीवर रेरा क्रमांक देणे आवश्यक झाले आहे. हा क्रमांक महारेराच्या वेबसाईटवर शोधल्यास त्या प्रकल्पाची सविस्तर माहिती आपल्याला एका क्लिकवर मिळते. ती वेबसाईट पुढीलप्रमाणे-
    https://maharera.mahaonline.gov.in/
  • पर स्क्वेअर फूट रेट (Per Square Foot Rate)- घरांच्या/जागेच्या किमती मोजण्याचं बांधकाम क्षेत्रातलं प्रमाण मापदंड (Standard Unit) हे स्क्वेअर फूट हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या जागेचा भाव सांगताना त्या जागेच्या एका स्क्वेअर फूटची किंमत किती हे सांगितले जाते. त्या भावानुसार तुम्ही किती स्क्वेअर फीट जागा विकत घेता, त्यावर त्या संपूर्ण जागेची किंमत ठरते. परंतु, फ्लॅट विकत घेताना त्याचा एरिया आधीच ठरलेला असतो आणि त्याची किंमतही ठरलेली असते. ही किंमतही स्क्वेअर फूट ह्या मापकानुसार ठरत असली तरी त्या गणितात गृहित धरलेला एरिया मात्र सेलेबल एरिया (Saleable area) म्हणजेच सुपर बिल्ट अप एरिया (Super Built up area) असतो. ह्याचाच अर्थ फ्लॅट खरेदी करताना आपण फक्त कार्पेट एरिया नाही, तर सुपर बिल्ट अप एरियाची किंमत देतो.
  • मेन्टेनेन्स (Maintenance Charges)-
    बिल्डिंगच्या/सोसायटीचे सामाईक परिसर (Common areas) जसे की आंगण, आवार, लिफ्ट, जिने, पॅसेज, बगीचा, इ. च्या देखभालीसाठी त्या सोसायटीच्या सर्व सभासदांनी/रहिवासींनी एकत्रितपणे द्यायचा खर्च म्हणजे मेन्टेनेन्स चार्जेस अर्थातच देखभाल शुल्क. हा साधारणपणे मासिक तत्वावर आकारला जातो.
  • स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty)- घर/फ्लॅट खरेदी केल्यावर त्याचे मालकी हक्क कायदेशीररित्या आपल्या नावावर होणे आवश्यक असते. ह्या मालकी हक्कांचे हस्तांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे स्थानिक सरकारी कार्यालयात ती मालमत्ता कागदोपत्री आपल्या नावावर होणे. ह्या प्रक्रियेसाठी त्या सरकारी कार्यालयात आपल्याला जे शुल्क भरावे लागते त्याला स्टॅम्प ड्युटी म्हणतात.

Related Blog