Home loan eligibility criteria

 • Posted by: Sahir
 • 11th December, 2018

होमलोन मंजूर होण्याचे निकष

आजकाल अनेक बँका त्यांच्या गृहकर्जाच्या सुविधांची जाहिरात करताना दिसतात. ईमेल, मेसेज, फोनद्वारे त्यांच्या गृहकर्जांच्या सुविधांची वैशिष्ट्ये आपल्यापर्यंत पोहोचतात. सध्याच्या घडीला जवळपास सर्वच बँकांची गृहकर्ज देण्यासाठी आधिकाधिक ग्राहक मिळवण्याची स्पर्धा चालू आहे. पण ह्याचा अर्थ आपण अर्ज केल्या केल्या आपल्याला कर्ज मिळेलच असा नाही. कोणत्याही बँकेने कितीही जाहिराती केल्या, तरी आपण अर्ज केल्यावर त्या अर्जाची अतिशय काळजीपूर्वक तपासणी आणि पडताळणी होतेच. त्यानंतर बँक आपण कर्ज मंजूर करण्यासाठी पात्र आहोत का, आणि आपल्याला खरंच कर्ज मंजूर होईल का हे ठरवते.

गृहकर्ज मंजूर करण्यासाठी बँकेचे पात्रतेचे नियम आणि निकष-

 • नोकरीतील स्थैर्य-
  हा स्रवात महत्वाचा निकष आहे. तुम्ही फक्त स्वतःच्या दृष्टीनेच नाही तर बँकेच्या दृष्टीनेही आर्थिक स्थिरस्थावर असणे गरजेचे आहे. बँकेच्या नियमांनुसार आर्थिक स्थैर्याची व्याख्या म्हणजे अर्जदार सध्याच्या नोकरी-व्यवसायात किती वर्ष काम करतो आहे? सतत नोकऱ्या किंवा व्यवसाय बदलणे ह्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. तुमचं वार्षिक उत्पन्न जास्त असलं, तरी तुम्ही एके ठिकाणी तेवढेच काम करणेही महत्वाचे असते. नोकरदार/पगारदार व्यक्तींनी किमान २ वर्ष तरी सध्याच्या नोकरीत स्थिर असणं गरजेचं आहे. स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांसाठी ही अट ५ वर्षांची आहे.
 • वय-
  तरूण अर्जदारांना कर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते. गृहकर्जासाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय साधारण २० ते ६० ह्या गटात असणे आवश्यक असते. पण ही अट नोकरदार/पगारदार वर्गासाठी आहे. स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या अर्जदारांचे वय कमीत कमी २४, तर जास्तीत जास्त ६४ असू शकते.
 • आर्थिक स्थैर्य-
  नोकरी-व्यवसायातील स्थैर्य महत्वाचं आहेच, पण तितकंच महत्वाचं आर्थिक स्थैर्यही आहे. एकाच नोकरीच्या ठिकाणी अनेक वर्ष काम करूनही तुमची आर्थिक स्थिती कर्ज फेडण्याची नसेल, तर तुम्हाला कर्ज मंजूर केलं जाणार नाही.
 • सिबील स्कोअर/क्रेडिट स्कोअर-
  तुमच्या आर्थिक व्यवहारांचा लेखाजोखा म्हणजे क्रेडिट किंवा सिबिल स्कोअर. हा स्कोअर किती असावा याचे निकष बँकेनुसार बदलतात. पण साधारण कमीत कमी ७५० स्कोअर हा चांगला मानला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *