नोकरी करण्याऱ्यांना होमलोनसाठी कोणती कागदपत्रं लागतात?

  • Posted by: Sahir
  • 30th November, 2018

होमलोन

नोकरी करण्याऱ्यांना होमलोनसाठी कोणती कागदपत्रं लागतात?

आज एकरकमी पैसे देऊन घर घेणं शक्य नाही. घरांच्या किमती कितीही कमी असल्या तरी नवीन घर विकत घेण्यासाठी लागणारी रक्कम ही नेहमीच जास्त असते. तेवढे पैसे एकत्र आपल्या गाठीशी असणं शक्य नसतं. नोकरदार वर्गासाठी तर ही अगदीच अशक्य गोष्ट आहे. मग मनात सहाजिकच येणारा पर्याय म्हणजे होम लोन.

बँकांकडून मिळणाऱ्या होम लोनच्या मदतीने नवीन घर विकत घेणं सोपं जातं. पण अनेकांना होमलोनची पूर्ण प्रक्रियाच किचकट आणि नकोशी वाटते. “खूप चकरा माराव्या लागतात, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन कागदपत्र आणायला सांगतात.” असा दावा अनेक जणं करतात. पण सर्व बँकांची होमलोनसाठी लागणारी प्राथमिक कागदपत्रं तर सारखीच असतात. मग असा गोंधळ का होतो? जर आपण अर्ज करायला जाण्याआधीच ह्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास केला, तर ही अडचण येणार नाही. त्याचसाठी तुम्हाला ही कागदपत्रांची यादी उपयोगी पडेल.

होमलोनचे अर्ज स्वीकारताना बँक तुमची ओळख, वय, इन्कम, इ. मूलभूत गोष्टी तपासून घेते. त्यासाठी ह्या गोष्टींना पूरक असे पुरावे आपण सादर करायला हवे.

  • गृहकर्जाचा संपूर्ण भरलेला व सही केलेला अर्ज
    सहाजिकच ही सगळी कागदपत्रं गृहकर्जाच्या अर्जाबरोबर जोडली जाणार असतात आणि सर्वात आधी तुमचा अर्ज तपासला जातो. त्यामुळे सर्वप्रथम आपला अर्ज नीट आणि योग्य भरला असल्याची खात्री करा. बऱ्याचदा अर्ज पूर्ण भरलेला असतो, पण काही ठिकाणी सह्या करायच्या राहतात. त्यामुळे आपला अर्ज दुसऱ्या व्यक्तीला तपासायला द्या. कदाचित आपल्याकडून नजरचुकीने काही गोष्टी राहून गेलेल्या असू शकतात.
  • ओळखपत्र (Identity Proof)-
    आपली ओळख प्रमाणित करणारं, फोटो असलेलं खालीलपैकी एक सरकारी प्रमाणपत्र-

    1. वाहनचालक परवाना (Driving License)
    2. मतदार ओळखपत्र (Voter’s ID)
    3. पासपोर्ट
    4. पॅनकार्ड
    5. आधारकार्ड
  • रहिवासी दाखला (Address Proof)
    आपण दिलेल्या पत्त्यावर राहतो हे नक्की करण्यासाठी खालीलपैकी एक-

    1. वाहनचालक परवाना (Driving License)
    2. मतदार ओळखपत्र (Voter’s ID)
    3. पासपोर्ट
    4. रेशनकार्ड
    5. वीजबिल
    6. फोन/मोबाईल बिल
    7. गॅसबिल/कार्ड
    8. घरभाडेपट्टीची पावती
    9. पत्रव्यवहाराचा पत्ता खरा असल्याचा दाखला देणारे सरकारी अधिकाऱ्याचे किंवा एम्प्लॉयरचे घोषणापत्र
    10. बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या पासबुकची झेरॉक्स
  • वयाचा दाखला (Age Proof)-
    1. वाहनचालक परवाना (Driving License)
    2. पासपोर्ट
    3. पॅनकार्ड
    4. जन्मदाखला
    5. इयत्ता १०वीचे गुणवत्ता प्रमाणपत्र (Mark sheet/Passing Certificate)
  • उत्पन्नाचा पुरावा(Income Proof/certificate)
    1. फॉर्म 16
    2. गेल्या ३ महिन्याच्या पगाराच्या पावत्या(Pay slips)
    3. गेल्या ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र(Income Tax Returns)
    4. गुंतवणुकींचे पुरावे (Investment Proofs of FD, Shares, etc)
  • पासपोर्ट आकारातील फोटो

  • कॅन्सल केलेला चेक
    आपले बँक खाते वैध आहे की नाही, हे तपासण्यासाठी कॅन्सल केलेला चेक सादर करावा लागतो.
  • प्रक्रिया शुल्काचा (प्रोसेसिंग फी) चेक.

होमलोनचा अर्ज देताना ह्या यादीप्रमाणे कागदपत्रं घेऊन गेल्यास आपला अमुल्य वेळ वाचू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *