4 Important Benefits of owning A Second Home.

  • Posted by: Sahir
  • 22nd December, 2018

सेकंड होमचे ४ महत्वाचे फायदे
benefits of second home

आपल्या अवतीभवती अनेकांचा भर दुसरं स्वतःचं घर घेण्यावर असतो. घराच्या किमती इतक्या वाढलेल्या असताना लोकांचा सेकंड होम घेण्याचा विचार का असतो असं आश्चर्य तुम्हाला वाटतं का? सेकंड होमच्या असणाऱ्या अनेक फायद्यांपैकी ४ महत्वाच्या फायद्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगू-

  • अतिरिक्त कमाई
    आपल्या मालकीचा पण आपण राहत नसलेले घर शक्यतो भाड्याने दिले जाते. ही नेहमीच अतिरिक्त कमाई ठरते. सेकंड होममुळे आपल्याला नोकरीशिवायही आवक सुरू होते. शिवाय तुमचं कर्ज चालू असेल, तर हे पैसे घराचा EMI भरायलाही कामी येऊ शकतात. त्यामुळे सेकंड होमचा हा सर्वात महत्वाचा फायदा आहे.
  • आयकरातल्या सवलती-
    सेकंड होम घेण्यासाठी कर्ज घेतले असेल, तर आयकरात कलम ८० सी आणि २४ बी अंतर्गत सूटही मिळते.
  • भविष्याची तरतूद-
    अतिरिक्त कमाई आणि आयकरातल्या सवलती हे महत्वाचे फायदे असले तरी आणखी एक फायदा ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतो, तो म्हणजे आपल्या आणि मुलांच्या भविष्याची तरतूद. आपल्या निवृत्तीनंतर रहायच्या सोयीसाठी, किंवा मुला-मुलींसाठी, त्यांच्या लग्नासाठी मालमत्ता म्हणून सेकंड होम नेहमीच फायद्याचं ठरतं.
  • विकेंड होम-
    रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून सुटका आणि आराम म्हणून आजकाल सेकंड होमकडे पाहिलं जातं जे आजिबात चुकीचं नाही. आपलंच घर असल्याने दुसऱ्या शहरात जाऊन रहायचा खर्च येत नाही, आणि आपल्याच घरात रहात असल्याने आपलेपणा आणि निवांत ह्या दोन्ही गोष्टींचा आनंद लुटता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *