Here’s why the real estate investment in Pune is rising

  • Posted by: Sahir
  • 07th January, 2019

real estate investment in Pune

Here’s why the real estate investment in Pune is rising

गेल्या काही वर्षातली आकडेवारी पाहिली तर पुण्यात घर घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढलेली दिसते. ह्या घरांमध्येही नीट पाहिलं तर गुंतवणूक म्हणून घेतलेल्या घरांची संख्या जास्त आहे. ह्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोनाने बघण्याची गरज आहे. पुणे हे महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे. भारतातल्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्येही पुण्याची गणना होते. आता तर पुण्याची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत आहे. सर्वात मोठं वैशिष्ट्यं म्हणजे भारताच्या आर्थिक राजधानीपासून म्हणजेच मुंबईपासून अगदी जवळचं मोठं शहर म्हणजे पुणे. अश्या सगळ्या कारणांमुळे पुण्यातल्या रिअल इस्टेटमधली वाढलेली गुंतवणूक काही आश्चर्याची बाब नाही.

पुर्वेचं ऑक्सफर्ड-
चांगल्या शैक्षणिक संस्था, शाळा, आणि कॉलेजची आजिबात उणीव नसलेलं पुणे शहर हे जगात पुर्वेचं ऑक्सफर्ड म्हणून ओळखलं जातं. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कला, विज्ञान, इ. अश्या सर्व शाखांसाठी पुण्यात विविध प्रकराचे दर्जेदार शिक्षण उपलब्ध आहे. ह्यामुळे फक्त महाराष्ट्रातलेच नाही, तर भारतातले आणि परदेशातलेही बरेच विद्यार्थी दरवर्षी इथे मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येतात. त्यांच्यातले बहुतांश नंतर इथे स्थायिकही होतात.

औद्योगिक संधींचा हॉट-स्पॉट-

विदेशी कंपन्यांची थेट गुंतवणूक होत असल्याने पुण्यात अनेक मल्टीनॅशनल आणि आय.टी. कंपन्यांनी बस्तान बसवले आहे. हिंजेवाडी, खराडी, मगरपट्टा हे इथले आय.टी. हॉटस्पॉट झाले आहेत. अभियांत्रिकी कंपन्यांचीही पुण्यात वाढ होते आहे. चाकण, पिपंरी चिंचवड, तळेगाव ह्या भागात ह्या कंपन्यांचा पट्टा दिसून येतो.

सांस्कृतिक वारसा-

पुण्याला अतिशय गौरवशाली इतिहास आणि सांस्कृतिक वारसा आहे. इथे जीवनशैली, खाद्यसंस्कृती, रहाणीमान, इ. सगळ्यात विविधता दिसून येते. औद्योगिक उलाढाली होत असलेलं पुणं जगण्यासाठी अतिशय शांततापूर्ण जीवनशैली उपलब्ध करून देतं. त्यामुळे भारताची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे रिअल इस्टेटमधल्या गुंतवणुकीसाठी प्रसिद्ध आहे.

अनुकूल हवामान

वर्षाचे बाराही महिने, प्रत्येक ऋतूत पुण्यातलं हवामान थंड आणि अनुकूल असतं. कुठल्याही हवामानाचा जास्त त्रास होत नाही. पुण्याचं हवामान सगळ्यांनाच मानवणारं आहे. दुसऱ्या शहरातून इथे रहायला आल्यावर वातावरणातील बदलाचा त्रास होत नाही. कुठल्याही शहरात रहाण्यासाठी तिथलं हवामान मानवणं महत्वाचं असतं. त्यामुळे पुण्यात घर घेताना इथल्या हवामानाचा सगळ्यांना आनंदच होतो.

इथे गुंतवणूक म्हणून घर घ्यायचं असल्यास नम्रता गृपच्या ह्या स्वस्त आणि मस्त प्रोजेक्ट्सना नक्की भेट द्या. पुण्यातल्या अनेक प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायांपैकी एक असलेला नम्रता गृप तळेगावमध्ये Happycity Talegaon, Ecocity 2.0, Aikonic, Slim Tower, तर रहाटणीमध्ये Life 360 Rahatni, 7 Plumeria Drive, आणि हिंजेवाडीमध्ये Unnati हे अतिशय सुंदर गृहप्रकल्प घेऊन आला आहे. आता तुम्हाला पर्यायांची काहीच कमतरता जाणवणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *