घर शोधताय, ते ही पुण्याच्या आसपास…

  • Posted by: Namrata Group
  • 12th October, 2018

home in pune

घर शोधताय, ते ही पुण्याच्या आसपास

आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे, घर पाहावं घेऊन आणि लग्न पाहावं करून.खरंच स्वतः च हक्काचं घर हा प्रत्येक माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. घर घेण्याची मोहीम हाती घेतली की साधारण आपल्या कामाचे ठिकाण, मुलांसाठी चांगली शाळा आणि जवळपास एखादे चांगले हॉस्पिटल आणि रोजच्या आयुष्यातील गरजा आसपास असाव्यात अशी किमान अपेक्षा असते. पण असे सगळे शोधणे म्हणजे भरपूर दूध देणारी, शिंग न मारणारी, रूपाने चांगली आणि तरीही स्वस्त गाय मिळण्याचा शोध घेण्यासारखे असते. आपल्या बजेट मध्ये बसणारे घर आणि वरील सर्व अपेक्षा पूर्ण करणारे लोकेशन याचा मेळ घालण्याची आपली धडपड असते.
आपली ही धडपड ‘नम्रता ग्रुपच्या हॅपी नेस्ट‘ या गृहप्रकल्पाला भेट देण्याने थांबू शकेल.

कुठे हा प्रकल्प नेमका….

इथे तुमच्या बजेटमध्ये बसणारे आणि वरील सर्व अटींची पूर्तता करणारे तुमचे घर तुम्हाला नक्की मिळेल अशी खात्री आहे. तळेगाव दाभाडे म्हणजे पुण्याच्या जवळचे एक छोटे पण विकसित ठिकाण, जिथे आहे ‘HAPPYNEST‘ नावाचा एक गृहप्रकल्प. नव्यानेच साकारणारा हा गृहप्रकल्प तळेगाव च्या अतिशय मध्यवर्ती आणि प्रसिद्ध आशा जिजामाता चौक आणि वराळे फाटा याच्या अगदी जवळ आहे. म्हणजेच तळेगाव रेल्वे स्टेशन पासूनही अगदी जवळ…..

शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था..

इथून हिंजवडी आणि चिंचवड ही दोनही ठिकाण अर्ध्या तासापेक्षाहि कमी अंतरावर आहेत, तसेच या प्रकल्पाच्या आसपास तुम्हाला हव्या तश्या इंग्लिश माध्यमाच्या भरपूर नामांकित शाळा आहेत जसे की हचिंग्स हाय स्कुल, हाय व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल, जैन इंग्लिश मिडीयम स्कुल, माउंट सेंट अँड कॉन्व्हेंट हाय स्कुल. या शाळांबरोबरच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशनल अँड रिसर्च, टोलानी म्यारिटाईम इन्स्टिट्यूट, सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि डॉ. डी वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग इत्यादी व्यावसायिक शिक्षण देणारी कॉलेजेस आहेत.

दैनंदिन गरजा…

या गृहप्रकल्पापासून किराणा दुकान, क्लिनिक, हॉस्पिटल, मंदिर, मनोरंजनाची ठिकाणे, इतकेच काय वाहतुकीची सुविधा सुद्धा अगदी चालण्याच्या अंतरावर उपलब्ध आहे.
म्हणजेच काय तर आपल्याला बजेट आणि लोकेशन या दोनही गोष्टीत कोणत्याही प्रकारची तडजोड करण्याची आवश्यकता नाहीये.

 डिझाइन

यासर्व गोष्टीसोबत आपण विचार करतो तो म्हणजे घरांच्या डिझाइनचा, हल्ली या डिझाइन मध्ये पण फार तोचतोपणा आपल्याला आढळतो, त्यातही इथले वेगळेपण आपल्याला भावते. या प्रकल्पात वन रूम किचन, 1 बीचके आणि 2 बीचके अशा सर्व प्रकारची घरे आहेत. यातून या प्रकल्पाचे डिझाइन करताना तुमच्या कुटुंबातील सभासद संख्या आणि तुमचे बजेट या दोन्हीचा नीटपणे विचार केला गेला आहे.

मोकळी जागा … मोकळा श्वास

तसेच या प्रकल्पात दोन बिल्डींग च्या मध्ये रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेत लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, वृद्ध व्यक्तीला बसायला जागा आणि हिरवेगार लॉन असा जागेचा व्यवस्थित केलेला उपयोग मनाला सुखावून जातो. या मोकळ्या जागेमुळे मनमोकळा श्वास घेता येतो.. आणि हो इथल्या मोकळ्या श्वासात ऑक्सिजनची पातळी पण वरची असेल. शहरातील वाढते प्रदूषण, वाहतुकीची कोंडी आणि वाढती प्रलोभने याचा विचार केला तर शहराला लागून पण शहराच्या या प्रश्नापासून दूर एका शांत ठिकाणी राहण्याचे सुखच काही वेगळे आहे, तेंव्हा घराच्या शोधात असाल तर नक्की नम्रता ग्रुपच्या या ‘ हॅपी नेस्ट‘ या गृहप्रकल्पाला भेट द्याच.

मुग्धा नलावडे

You may also like-

Here Are Some Upcoming Talegaon Projects

What does HappyCity mean to you?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *