All About RERA FAQs

  • Posted by: Sahir
  • 23rd December, 2018

रेराबद्दलची माहिती
RERA FAQs

१.रेरा म्हणजे काय?

रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍक्ट (Real Estate Regulatory Act). बांधकाम व्यवसायातल्या व्यवहारांत पारदर्शकता येण्यासाठी रेरा अंमलात आणण्यात आला. ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि होणाऱ्या सगळ्या व्यवहारांत ग्राहकांवर अन्याय होऊ नये ह्या दृष्टीने सरकारने हे महत्वाचे पाऊल उचललेले आहे.

२.रेरा का?

आत्तापर्यंत अनेक वर्ष ग्राहकांच्या फसवणूक झाल्याच्या तक्रारी असायच्या. घरखरेदीच्या व्यवहारात बांधकाम व्यवसायिकांचाच फायदा अधिक असतो आणि त्यात ग्राहकांची पिळवणूक होते असा सूर आजवर ग्राहकांचा असायचा. परंतु, रेरामुळे ह्या अडचणी दूर होवून, घर खरेदी-विक्रीच्या व्यवसायात पारदर्शकता येईल आणि ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना न्याय मिळेल असे प्रयत्न आहेत.

३.रेरामुळे लागू होणारे महत्वाचे नियम-

  • कोणत्याही बांधकामाची रेराअंतर्गत नोंदणी झाल्याशिवाय त्याची जाहिरात करता येणार नाही.
  • बांधकामाच्या योजना, आकृती, परवानगी, जमिनीची/भूखंडाची कायदेशीर नोंदणीप्रकिया, इ. सर्व बाबी ग्राहकांना (त्यांनी विचारल्यास) दाखवणे बंधनकारक.
  • छोट्या-मोठ्या कोणत्याही प्रकारच्या बदलांबाबत ग्राहकांना कळवणे बंधनकारक.
  • ग्राहकांकडून आलेल्या एकूण रकमेच्या ७० टक्के रक्कम रेराच्या खात्यात भरणे बंधनकारक.

४.छोट्या भूखंडावर/जमिनीवर उभारणाऱ्या बांधकामासाठीही रेरा नोंदणी बंधनकारक आहे का?

८ पेक्षा अधिक फ्लॅट नसणाऱ्या किंवा ५०० चौ. मी.पेक्षा अधिक नसणाऱ्या जमिनीवरील बांधकामांसाठी रेरा नोंदणी बंधनकारक नाही.

५.चालू असणाऱ्या किंवा पूर्ण झालेल्या सर्व बांधकामांना रेरा नोंदणी आवश्यक आहे का?

३१ जुलै २०१७ या तारखेला किंवा त्याआधी बांधकामाचे कम्प्लिशन सर्टिफिकेट न मिळालेल्या सर्व बांधकामांसाठी रेरा नोंदणी बंधनकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *