मुंबईकरांनी पुण्यात घर घेण्यामागची ४ महत्वाची कारणं

 • Posted by: Sahir
 • 03rd November, 2018

Buying Home In Pune

मुंबईकरांनी पुण्यात घर घेण्यामागची ४ महत्वाची कारणं

गेल्या काही वर्षांत मुंबईकरांचा पुण्यात घर घेण्याकडे कल वाढलेला दिसून येतोय. घरांच्या विक्रीचे तपशील पाहिले, तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते, ती म्हणजे पुण्यात 2BHK घेणारे ग्राहक मुख्यत्वे मुंबईचे असतात. कोणत्याही बाबतीत कमी नसणारी मुंबई मध्यमवर्गीयांना परवडेल आणि आवडेल असं छानसं, मोठं घरकुल मात्र देऊ शकत नाही. असं असलं तरी मुंबईकरांनी पुण्यात मोठी घरं घेण्यामागची इतर कारणं काय आहेत?

 • थंड हवामान-
  मुंबईनंतर पहिली पसंती पुण्याला असण्याचं मुख्य कारण म्हणजे उकाड्यापासून सुटका. पुण्याचं हवामान उत्तम आहे ह्यात दूमत नाही. मुंबईपेक्षा थंड वातावरण हे नेहमीच लोकांना आकर्षित करतं.
 • आगणित संधी-
  शिक्षण, नोकरी, पर्यटन, औद्योगिक क्षेत्रं ह्या कशाचीही पुण्यात कमी नाही. नामांकित शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची हजेरी, लाभलेला सांस्कृतिक वारसा, आणि सातत्याने होणारा विकास ह्यामुळे पुणे शहराची सगळ्याच बाबतीत आघाडी दिसून येते.
 • खिशाला परवडणारी घरं-
  मुंबईत जागांच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत आणि महागाईचाही थेट परिणाम होत असताना मुंबईत घर घेणं सामान्य नागरिकांना परवडत नाही. खूप पैसे मोजूनही लहान जागा मिळते. मग नोकरी मुंबईत आणि घर लांबवर पसरलेल्या उपनरगात अशी परिस्थिती निर्माण होते. त्यापेक्षा आपल्या सेव्हिंग्समधून पुण्यात तितक्याच किमतीत मोठं घर सहज उपलब्ध होतं. त्यामुळे आपल्या घराच्या स्वप्नाबरोबर तडजोड न करता अनेक मुंबईकर पुण्यात आनंदाने घर घेताना दिसतात.
 • सेकंड होम-
  अनेकांची मुंबईतही घरं असतातच. पण गुंतवणूक म्हणून सेकंड होमचा विचार करणाऱ्यांना मुंबईत घर घेणं शक्य होत नाही. अपेक्षांशी तडजोड करून मुंबईत रहायला एखादं छोटं घर घेणं कदाचित चालू शकतं. परंतु सेकंड होम हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. “आता नवीन घरं घ्यायचं ते तर मोठं घ्यायचं.” असं अनेकांचं स्वप्न असतं. मग ते घेताना आपल्या स्वप्नांशी आणि अपेक्षांशी तडजोड का करावी? ते ही मुंबईपासून जवळच असलेल्या, सर्व बाबतीत परिपूर्ण असलेल्या पुणे शहरात परवडणाऱ्या किमतीत मोठं सेकंड होम मिळत असताना!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *