तळेगावात लवकरात लवकर घर खरेदी करण्याची ४ महत्वाची कारणे

  • Posted by: Sahir
  • 02nd July, 2019

तळेगावात लवकरात लवकर घर खरेदी करण्याची ४ महत्वाची कारणे

महाराष्ट्रासारख्या विकसनशील राज्यात अनेक गावं आणि शहरं आहेत. काही शहरांचा विकास झपाट्याने झाल्याने ती वास्तव्यासाठी आणि रोजगारासाठी प्रसिद्ध झाली आणि तिथे स्थलांतरित होणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढू लागली. मुंबई, पुणे, नाशिक ही त्यातली काही महत्वाची नावं. मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी होण्याच्या आधीपासूनच महत्वाचं शहर असण्याचं कारण ब्रिटीशांची राजवट हे होतं. परंतु त्यानंतर मुंबईचा विकासाचा आलेख सतत उंचावत गेला. त्यामागोमाग झपाट्याने प्रगती करत चहुबाजूंनी विस्तारणारं शहर म्हणजे मुंबईपासून फक्त २ तासांच्या अंतरावर असणारं पुणे शहर. पुणे शहराची व्यप्तीही आता वेगाने वाढत चालली आहे. पुणे शहर हे आता फक्त काही मोजक्या पेठांपुरता मर्यादित राहिलेलं नाही. पेठांबाहेर सिंहगड रस्ता, कोथरूड, वारजे या भागातही लोकांची गर्दी वाढून आता हे भागही शहराच्या प्रमुख भागांमध्ये मोजले जातात.

परंतु, पुण्यातल्या शिक्षणाच्या आणि रोजगारांच्या संधींच्या मागे धावत इथे स्थायिक व्हायला येणाऱ्या लोकांना याच कारणांसाठी आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचायला करावा लागणारा प्रवास मात्र मनस्ताप देणारा ठरतो. भयानक प्रदुषण आणि वाहतुक कोंडी यामुळे काही मिनिटांच्या अंतरावर असलेला प्रवास हा काही तासांचा झालाय आणि हा वेळ दिवसेंदिवस आणखी वाढतो आहे. सध्या पुण्यातल्या औद्योगिक संधी या हिंजेवाडी, बाणेर, औंध, तळेगाव-चाकण एमआयडीसी या भागात आहेत. त्यामुळे नोकरदारांना २० मिनिट ते अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी पोहोचण्यासाठी कमीत कमी एक ते दीड तास घालवावा लागतो. या प्रवासात मानसिक आणि शारिरीक थकवा तर येतोच, पण पैसा आणि वेळही तितकाच वाया जातो. त्यामुळे लोकांचा ओढा आता पेठांपेक्षा आपल्या नोकरीच्या जवळपासच्या भागात राहण्याकडे जास्त वाढला आहे. आणि याच महत्वाच्या कारणामुळे सध्या नोकरदार वर्ग एक नवं शहर म्हणून झपाट्याने विकास करणाऱ्या तळेगावात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होताना दिसतो.

तळेगाव का?

तळेगावात रहायला जाण्याच्या काही महत्वाच्या कारणांपैकी मुख्य कारण हेच आहे की तळेगाव आत्ता त्याच्या विकसनशीलतेच्या टप्प्यात आहे. पुर्वीपेक्षा तळेगावाची प्रगती बरीच झालेली असली तरी तिथल्या शहरी सुविधा दिवसेंदिवस अधिकाधिक सुधारतच आहेत.

  • प्रवासाचा वेळ कमी-

पुण्यातल्या औद्योगिक पट्ट्याच्या म्हणजे हिंजेवाडी, वाकड, चाकण, तळेगाव एमआयडीसी हे सर्व भाग तळेगाव शहरापासून २० मिनिटांच्या अंतरावर आहेत. कामाच्या ठिकाणी ये-जा करणारी बहुतांश मंडळी ही चांदणी चौकाच्या दिशेकडून येत असल्याने वाहतुकीची वर्दळ त्याच दिशेला जास्त असते. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या ही तळेगावच्या विरूद्ध दिशेला उद्भवते. परिणामी तळेगावात राहणाऱ्यांना ऑफिसला किंवा घरी पोहोचायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. या सगळ्यांत प्रवासाचा वेळ तर कमी होतोच, पण मानसिक आणि शारिरीक थकवाही मोठ्या प्रमाणात कमी होतो.

  • आरोग्यदायी वातावरण-

तळेगाव हे पुर्वीपासून इथल्या आरोग्यदायी हवेमुळे आणि थंड वातावणामुळे प्रसिद्ध आहे. हाच गारवा आणि स्वास्थ्याला पूरक हवामान अजूनही इथे टिकून आहे. गाड्यांच्या वाढतच जाणाऱ्या संख्येमुळे पुण्यामुंबईसारखे प्रदुषण इथे नाही. त्यामुळे इथली हवा प्रदुषणविरहित आणि शुद्ध आहे. तसंच, लोणावळ्याहून जवळ असल्याने मुंबईपेक्षा जास्तच पण पुण्यापेक्षाही जास्त गारवा इथे जाणवतो.

  • निसर्गाच्या कुशीत वास्तव्य-

तळेगाव शहर थंड असण्याचं आणखी एक कारण म्हणजे इथली हिरवळ. लोकांचा इथे रहायला येण्यासाठी ओढा वाढत असला तरी तळेगाव शहराने हक्काने राखून ठेवलेली एक गोष्ट म्हणजे इथली वृक्षसंपदा. सह्याद्रीच्या पर्वतरांगानी वेढलेलं तळेगाव शहर हिरवळीने सतत फुललेलं असतं. त्यामुळे डोळ्यांना शांतता देणारं निसर्गरम्य दृश्य आणि मनाला आणि शरिराला शांतता देणारा थंडावा अशी परिपूर्ण देणगी इथे लाभते.

  • मध्यवर्ती ठिकाणी घर-

हा सर्वात महत्वाचा फायदा तळेगावात आपल्याला घेता येतो. तळेगाव हे आत्ता विकसनशील टप्प्यात आहे. शहराच्या सुविधा वाढत आहेत, तसतसा त्याचा विस्तारही वाढतो आहे. तरी पुण्यामुंबईच्या मानाने तळेगाव हे बऱ्यापैकी लहान शहर आहे. त्यामुळे इथे सुरू असणारे गृहप्रकल्प हे अगदी मध्यवर्ती भागांमध्ये असून रेल्वेस्टेशन, मोठ्या आणि प्रसिद्ध शाळा-कॉलेज, दवाखाने, मोठी दुकानं अशा दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या सर्व भागांपासून हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे भविष्यात खंत करण्यापेक्षा ‘शहर बसते देखा है हमने’ म्हणत खिशाला परवडणाऱ्या दरात आत्ताच तळेगावात घर घेण्याची संधी न दवडलेलीच बरी.

तळेगावात सध्या सुरू असणारे आणि लोकांनी मोठ्या संख्येने बुकींग केले काही महत्वाचे गृहप्रकल्प म्हणजे नम्रता गृपचे हॅपिसीटी, आयकॉनिक, आणि इकोसिटी हे प्रकल्प. अत्यंत मध्यवर्ती भागात आणि रेल्वे स्टेशनपासून फक्त एक ते दीड किमी अंतरावर असलेल्या या प्रकल्पांमध्ये खिशाला परवडतील अशा अगदी कमी किमतीत १ आणि २ बीएचके फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचबरोबर वास्तव्यास येणाऱ्या कुटुंबाचाही विचार करून इथे विविध प्रकारच्या उपयुक्त अमेनिटीजही देण्यात आल्या आहेत.

म्हणून तळेगाव आणि नम्रता गृपच्या या बजेट होम्सना त्वरित भेट द्या आणि आपलं हक्काचं घर बुक करा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *